पुणे शहरातील काही भागांना काल मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. सोसाट्याच्या वाऱ्यासह तास दीड तास पडलेल्या या पावसानं शहरात एक मोबाईल टॉवर आणि दिशादर्शक फलक कोसळला. सुदैवानं लॉकडाउनमुळं संबंधित घटनास्थळी कोणी नसल्यानं कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, शनिपार चौकात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या चेकपॉईंटचं शेड सोसाट्याच्या वाऱ्यानं उडून जाणार होतं. मात्र, ते आपल्या हातानं पकडून ठेवत एका पोलीस अधिकाऱ्यानं होणारं संभाव्य नुकसान टाळलं.