नवी दिल्ली : अॅपलचा नवा सेव्हन्थ जनरेशनचा ३२ जीबी मेमरी असलेला आयपॅड भारतात उपलब्ध झाला आहे. या १०.२ इंचाच्या आयपॅडची किंमत २५० अमेरिकन डॉलर अर्थात १८,९६३ रुपये आहे. अॅमेझॉन आणि बेस्ट बाय या ई-कॉमर्स साईटवर हा आयपॅड भारतात उपलब्ध आहे. यापूर्वी या व्हर्जनच्या आयपॅडची किंमत ३३० डॉलर इतकी होती. हा अॅपलच्या सिक्थ जनरेशन मॉडेलशी काहीशी मिळता जुळता आहे. यामध्येही A10 प्रोसेसर असन फक्त याचा स्क्रिन साईज 9.7 इंचाहून 10.2 इंचापर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर सिक्थ जनरेशमध्ये २ जीबी रॅम होती ती नव्या आयपॅडमध्ये ३ जीबी देण्यात आली आहे. तसेच त्याला स्मार्ट कनेक्टरही देण्यात आला आहे. याला तुम्ही अॅपलचा स्मार्ट किबोर्डही जोडू शकता.