लॉकडाउनच्या काळात लोकांना अन्नदान करीत असताना पिंपरी-चिंचवडमधील एका सामाजिक कार्यकर्ता तरुणाला करोनाची लागण झाली त्यानंतर त्यावर योग्य प्रकारे उपचार घेऊन तो बराही झाला. करोनामुक्त झाल्यानंतर त्यानं नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. करोनाला घाबरु जाऊ नका आणि तो लपवूही नका. त्रास होत असेल तर तपासणीसाठी तत्काळ घराबाहेर पडा. यासाठी जर तुम्ही घराबाहेर निघाला नाहीत तर येणाऱा काळ सर्वांसाठी अवघड होईल, त्यावेळी डॉक्टरचं काय देवही तुम्हाला वाचवू शकणार नाही, अशा शब्दांत त्यानं लोकांना मोलाचा सल्ला दिला आहे.