३१ मे नंतर लॉकडाउन वाढणार का? लॉकडाउन ५ लागू होणार का? असे प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात उठत आहेत. यासंदर्भात जी काही घोषणा असेल ती पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मे रोजी आपल्या मन की बात मध्ये करण्याची शक्यता आहे. पण सध्या जी चर्चा सुरू आहे त्यानुसार लॉकडाउन काही नियम घालून शिथिल करण्याचा आणि जिथं करोना जास्त प्रमाणात वाढलाय तिथं लॉकडाउन कडक करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. चला तर पाहुयात लॉकडाउन ५ लागू होऊ शकतो की नाही याची चिन्हं दिसतात का..