करोनाच्या संकटात अनेक डॉक्टर आपलं कर्तव्य अगदी चोखपणे बजावत आहेत. त्यातीलच एक डॉ. प्राजक्ता प्रमोद जंगम ह्या असून त्या करोनाबाधित लहान मुलांवर उपचार करतात. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक लहान मुलांना त्यांनी जीवनदान दिले असून, योग्य उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. ज्या दिवशी लहान मुलं करोनामुक्त (डिस्चार्ज) होतात. तेव्हा, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो, असं डॉ. प्राजक्ता जंगम आवर्जून सांगतात. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्या कार्यरत आहेत