नवी दिल्ली : फेसबुकने यापूर्वीच जाहीर केलेले नवे गुगल फोटो ट्रान्सफर टूल आता जगभरात सगळीकडे उपलब्ध झाले आहे. एप्रिल महिन्यात हे टूल पहिल्यांदा अमेरिका आणि कॅनडामध्ये लॉन्च करण्यात आले होते. आता ते जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या टूलच्या माध्यमातून फेसबुकवरुन तुम्हाला फोटो, व्हिडीओ आणि इतर मीडिया आपल्या गुगल फोटो अकाऊंटवर केवळ एका क्लीकद्वारे पाठवता येणार आहे. यासाठी ‘युवर फेसबुक इन्फॉर्मेशन’ या मेनूमधील सेटिंग्जमध्ये जाऊन ‘ट्रान्सफर अ कॉपी ऑफ युवर फोटोज ऑर व्हिडीओज’ हा पर्याय युजरला निवडता येईल. यासाठी पासवर्डही विचारला जाईल.