वाहनचालकांना आपल्या गाडीत स्वत:च पेट्रोल डिझेल भरण्याची सुविधा करून देण्यात येत आहे. पुण्यातील आरटीओ ऑफिसच्या समोरील पेट्रोल पंपावर वाहन चालकांना आपल्या गाडीत स्वत:च पेट्रोल कसं भरावं याचं प्रशिक्षण देण्यात आलं. पेट्रोल अथवा डिझेल भरण्यासाठी पंपावरील कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्याचा एक मार्ग म्हणून याकडे बघण्यात येत आहे.