देशभरात सर्वाधिक करोना बाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र हा अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे रेड झोन मध्ये येतात. अश्या या परिस्थितीमध्ये नागरिकांनी सर्व काळजीनिशी घराबाहेर पडावे. ऐन लग्नसराईच्या काळात करोनाने हाहाकार माजवला आहे. मात्र या काळातही ठरलेली लग्न होत आहेत. अशावेळी पैठणी साड्यांची जास्त चलती असते. पैठणी साड्यांसोबत करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील धनश्री पाठक यांनी नवा उपक्रम सुरू केला आहे. पैठणी साड्यांचे मास्क त्यांनी बनवले आहे. या व्हिडिओमध्ये या मास्क विषयी आपण जाणून घेऊया.