सरकार गोंधळलेलं असल्याने कशाचाच निर्णय नाही : चंद्रकांत पाटील
राज्यातील करोनाची दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या परिस्थितीवरून तसेच, निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या मुद्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार गोंधळलेलं व लेचपेचं असल्यानेच कोणताही निर्णय होत नाही, असं त्यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर पुण्यात बोलून दाखवलं.