करोना विषाणू संसर्गामुळे एमपीएससीने नियोजित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न राज्यभरातील उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत होता.