लॉकडाउनच्या काळात महावितरणने घरोघरी जाऊन वीज रिडिंग बंद ठेवली होती. मात्र, या काळातील अंदाजे काढलेली भरमसाठ वीजेची बिलं ग्राहकांना पाठवण्यात आल्याचे प्रकार समोर आली आहेत. या निषेधार्थ राज्य शासन आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात गुरुवारी पुण्यात भाजपाने आंदोलन केले. रस्ता पेठेतील महावितरणच्या प्रवेशद्वाराबाहेर भाजपाने कंदील घेऊन आणि लाईट बिलं जाळून निषेध व्यक्त केला.