करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका क्रिकेटलाही बसला. प्रादूर्भाव वाढू नये यासाठी आयसीसीने मार्च महिन्यात सर्व आंतरराष्ट्रीय सामने थांबवले. मात्र स्पर्धा बंद असल्यामुळे होत असलेलं आर्थिक नुकसान लक्षात घेता आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची रखडलेली गाडी पुन्हा सुरु करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. तब्बल ३ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु होतंय, आतापर्यंत काय-काय घडलं आणि भविष्यात भारतीय खेळाडू मैदानात कधी उतरणार याचा घेतलेला हा आढावा