पुण्यात १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या लॉकडाउनच्या कालावधीत दूध आणि मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील असंही विभागीय आयुक्तांनी काही वेळापूर्वीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.