महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) पोलिसांचा विशेष गट तयार केल आहे. याला ‘पोर्टेट बिल्डिंग सेक्शन’ असं नाव देण्यात आलं आहे. या इमारतीमध्ये चित्रकलेचं चांगलं ज्ञान असलेल्या पोलिसांना रेखाचित्र काढण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. गुन्हेगारांची रेखाचित्र कशी काढायची त्यासाठी कुठली उपकरणं वापरायची, कशा प्रकारे प्रत्यक्षदर्शींकडून माहिती मिळवायची. याचा एक बेसिक कोर्सच इथे तयार करण्यात आला आहे. यासाठी दहा पोलिसांची पहिल्या बॅचला शुक्रवारपासून सुरुवात झाली. देशात अशा प्रकारे सुरु करण्यात आलेली ही पहिलीच इमारत आहे.