कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे भागातील नागरिकांना नुकतेच दुर्मिळ ब्लॅक पँथरचे अनपेक्षितपणे दर्शन झाले. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. वनविभागाने या व्हिडिओस दुजोरा दिला असून ब्लॅक पँथरवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा बसवण्यात येणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे