उद्या क्रांती दिनी राज्यातील अनेक भागात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी जागरण गोंधळ, मशाली पेटवून आणि काळे कपडे घालून हे आंदोलन होईल. मुख्यमंत्री ठाकरे आणि अशोक चव्हाण जिकडे दौरे करतील तिथे आंदोलनं करण्यात येईल, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. तसेच चव्हाण यांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून बाजूला करून सरकारमधील अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यापैकी एखाद्या नेत्यावर ती जबाबदारी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.