मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यामुळं राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं दिलेली स्थगिती उठवण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत. विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि नियुक्त्या संरक्षित कराव्यात. त्याचबरोबर एसईबीसी प्रवर्गांतर्गतील सर्व सवलती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या त्या लागू कराव्यात. सारथी संस्था कार्यन्वीत करावी, अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.