केंद्र सरकारने कांद्यावरती निर्बंध आल्याने राज्यात ठिकठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मार्फत रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पुण्यातील सिटी पोस्ट ऑफिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र आणि राज्यपाल यांना पोस्टाने कांदे पाठवून निषेध व्यक्त केला.