पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर परिसरात दरोडा, जबरी चोरी, खून असे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ११ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात १०० किलो चांदीचे दागिने, पाऊण किलो सोन्याचे दागिने, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत.