‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अर्णब यांच्या अटकेमुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणावर एक नजर टाकूया.. आणि समजून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?