राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचं मंत्रीपदाच्या वाटपात मतैक दिसतंय. पण काँग्रेसला जाणीवपूर्वक जनतेच्या मनातून उतरवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डाव आहे. नितीन राऊत हे काँग्रेसचे मंत्री आहेत त्यांना तोंडावर पाडण्याचं काम राष्ट्रवादी-शिवसेनेनं केलंय. महाविकास आघाडीत काँग्रेसची फरफट सुरु आहे, काँग्रेसने ती करुन घेऊ नये. जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी.