वीज बिलांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत ग्राहक मेळावे होऊ देणार नाही – दरेकर
लॉकडाउनच्या काळातील वाढीव वीजबिलांबाबत सरकारने नागरिकांना दिलासा दिलेला नाही. उलट ती बिलं कशी योग्य आहेत, हे सांगण्यासाठी जनजागृती आणि ग्राहक मेळावे घेतले जात आहेत. त्यामुळे आम्ही इशारा देतो की, अशा प्रकारचा ग्राहक मेळावा झाला तर आम्ही तो होऊ देणार नाही, उधळून लावू. कारण ग्राहकांचं हित महत्वाचं आहे. त्यामुळे यासंदर्भात निर्णय होईपर्यंत अशा प्रकारचे ग्राहक मेळावे आम्ही होऊ देणार नाही.