२१ जून २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी M-Yoga App चे अनावरण देखील करण्यात आले. M-Yoga App च्या मदतीने योगविद्येच्या प्रशिक्षणा संबंधित कित्येक व्हिडिओ वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. तसेच ‘M-Yoga App’ हे ‘One World, One Health’ मध्ये महत्वाचे योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.