मुंबईतील रहेजा रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी मोफत लसीकरण उपक्रम
मुंबईतील रहेजा रुग्णालयाने एक पाऊल पुढे टाकत तृतीयपंथीयांसाठी मोफत लसीकरण उपक्रम राबवला आहे. रहेजा रुग्णालयातील प्रमुख डॉ. अमित रावल यांनी यासंबंधी अधिक माहिती दिली. पहिल्या टप्प्यात ७५-१०० तृतीयपंथीयांची नोंदणी करण्यात आली असून भविष्यात असेच आणखी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.