पठाण फिल्मला देशभरातील साधू, संत, महात्मा यांच्याशिवाय सोशल मीडियावरदेखील अनेक हिंदू संघटना आणि अनेक लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत. पठाण फिल्मचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडायला हवी, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी दिली आहे.