Chandrakant Patil यांच्याविषयी ‘त्या’ वक्तव्यावर Chitra Wagh यांचं स्पष्टीकरण भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुण्यातील कार्यक्रमात उच्च व तंत्रशक्षिण मंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. त्या विधानावरून विरोधकांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेबाबत चित्रा वाघ यांनी आता भाष्य केलं आहे. रिकामटेकड्या लोकांना काय वादच लागतात. त्यांना काही काम आहे का?, असा टोला त्यांनी लगावला आहे