नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला २३ मार्चला उधमपूर येथील रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना ‘भगवान राम यांना अल्लाहने लोकांना उपदेश करण्यासाठी पाठवले होते’ असे वक्तव्य केले. यापुढे ते म्हणाले की , “राम हे फक्त हिंदूंचे दैवत नाही हे लक्षात ठेवा. धर्माचा विचार न करता त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाचा तो देव आहे. त्याचप्रमाणे ‘अल्लाह’ हा केवळ मुस्लिमांचा नाही तर तो सर्वांचा देव आहे”