खासदार गिरीश बापट यांनी वयाच्या ७२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.