भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची आज प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात गिरीश बापटांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.