छत्रपती संभाजीनगर शहरात दोन गटात राडा झाल्याने वातावरण तापलं होतं. शहरात घडलेली ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. ही घटना लहान नाही, पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात ते पोलिस आयुक्तांनाही भेटणार असल्याचं म्हणाले