उद्धव ठाकरे आणि मविआला समजलंय की पोपट मेलाय, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना केलं होतं. त्यावर खासरदार संजय राऊत यांनी पोपट मेलाच आहे, असं म्हणत पलटवार केला आहे. मला वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, असा टोलाही राऊतांनी लगावला.





















