New Parliament Inauguration: संसदेत सर्वधर्म प्रार्थना; मोदींसह दिग्गजांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नव्या संसद भवन इमारतीचं उद्घाटन पार पडलं. यावेळी विधीवत पूजेपासून उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झाली. नवं संसद भवन अनेक कारणांनी विशेष ठरत आहे. यापैकीच एक म्हणजे उद्घाटन सोहळ्यात सर्वधर्म प्रार्थना घेण्यात आली. त्यामुळे नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त धार्मिक एकतेचं चित्र पाहायला मिळालं