महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. नागपुरातील मंदिरात याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली. दरम्यान यावरून आता अनेक प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.