राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १ जून रोजी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यानंतर स्वतः शरद पवारांनी या भेटीमागचं कारण सांगितलं. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.