राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले अन् चर्चांना उधाण आलं. यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील व्हिडीओ शेअर करत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेतील तो निर्णय अंतिम असेल असं सांगितलं. यानंतर आता विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी या शिरूर खासदारकी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.