Shrikant Shinde: ‘माझ्यावर टीका करा, पण…’; राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर श्रीकांत शिंदेंचे उत्तर
संजय राऊत यांनी केलेल्या थुंकण्याच्या कृतीवर श्रीकांत शिंदे प्रत्युत्तर देताना म्हणाले की, “माझ्यावर टीका करा पण माझे उत्तर कामातून असेल. आम्ही पातळी कधी सोडलेली नाही आणि सोडणार देखील नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम ते करतात. महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे, वेगळी संस्कृती आहे; जिथे विरोधकदेखील एकमेकांचे नाव आदराने घेतात. आज त्या सगळ्या पातळी सोडून सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शिव्या देण्याचं काम सुरू आहे”