औरंगजेबाच्या स्टेटसमुळे कोल्हापूरातील वातावरण गेले काही दिवस तापल्याचं पाहायला मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची बैठक बोलवली होती. या प्रकरणाची चौकशी होईल. तसंच कोल्हापूर या क्षणापासून शांत राहील याची ग्वाही सर्वपक्षीय प्रमुखांकडून मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.