मध्य प्रदेशमधील सीहोर जिल्ह्यात मंगळवारी (०६ जून) एक धक्कादायक घटना घडली. येथील एक अवघी अडीच वर्षांची मुलगी बोअरवेलमध्ये पडली आहे. ही बोअरवेल तब्बल ३०० फूट खोल आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा जिल्हा असलेल्या सीहोरमधल्या मुंगावली गावात काल दुपारी १.३० च्या सुमारास ही मुलगी बोअरवेलमध्ये पडली. या मुलीचं नाव सृष्टी असं असून तिच्या वडिलांचं नाव राहुल कुशवाह असं आहे. ही मुलगी सुरुवातीला २९ फूट खाली अडकली होती. परंतु आता ५० फूट खाली गेली आहे. तिला पाईपद्वारे ऑक्सिजन आणि खाण्यापिण्याचं साहित्य दिलं जात आहे.