शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी अन् सुप्रिया सुळे पोलीस आयुक्तांच्या भेटीला; पाहा नेमकं झालं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांना ही धमकी देण्यात आली असून “तुमचाही दाभोलकर होणार”, अशी पोस्ट या अकाऊंटवर करण्यात आली आहे. तसेच, या धमकीबरोबरच शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. यासंदर्भात गृहविभागानं लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली आहे.