Ajit Pawar: ‘आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय सांगते?’; राणेंच्या वक्तव्यावर पवारांची प्रतिक्रिया
भाजपा नेते नितेश राणे आणि अनेक राजकीय नेत्यांच्या अपशब्द असलेल्या टीकांवर आपली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय सांगते आणि असं असतानाही गलिच्छ पद्धतीने बोलायचे काम काही राजकीय नेते करत आहेत. त्यांना समजतं पण इतरांना समजत नाही का? वरिष्ठ लोकांनी त्यांना सांगितलं पाहिजे. सगळे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी चिखलफेक करायची गरज नाही. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे”