Kiran Bedi: गुन्हेगारी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर किरण बेदींचे परखड मत
सध्या घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर बोलताना माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “प्रत्येक पालक, शिक्षक, शाळा आणि विद्यापीठ मुलांना घडवत असतं. फक्त व्यवसायिक शिक्षण देऊन उपयोग नाही मूल्यांवर आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी जबाबदार नागरिक घडवण्याची जबाबदारी ही फक्त समाजाची नाही तर शिक्षण आणि पालकांची देखील आहे. सध्या लिडरशिप गरजेची, समाज तर आपणच तयार करतो”