Sanjay Raut: ‘सरकारला हवं असेल तर आम्ही या धमक्या स्विकारु’; आलेल्या धमकीवर राऊतांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. अशातच या धमकीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला धमकी आली ही विशेष वाटत नाही परंतु शरद पवार यांना ज्या पध्दतीने धमकी आली ती बाब अत्यंत गंभीर आहे. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची अधोगती मान्य आहे का? मला आलेली धमकी ही सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजे”