Ashadhi Wari 2023: हजारो वारकरी देहूत दाखल; पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्साह | Dehu
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज १० जून रोजी पार पडत आहे. दुपारी दोनच्या सुमारास पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यात राज्यभरातून वारकरी दाखल झाले आहेत. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडावा अशी मागणी बळीराजाने तुकोबा चरणी केली आहे. यंदाचा पालखी सोहळा हा उत्साह पूर्ण पार पडावा अशी मागणी देखील बळीराजाने केली आहे.