देशातील २६ विरोधी पक्षांची १९ जुलैला बंगळुरूत बैठक पार पडली. यावेळी विरोधकांच्या एकजुटीला ‘इंडिया’ असं नवं नाव देण्यात आलं. एकीककडे विरोधकांची बैठक झाली. तर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत एनडीएतील घटक पक्षांची बैठकही पार पडली. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे. तसंच इंडिया नावावरू आक्षेप घेणाऱ्यांनाही त्यांनी सुनावलं