राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. पत्रकार परिषदा, माध्यमांशी संवाद किंवा जाहीर सभांमधली भाषणं, या सर्व ठिकाणी अजित पवारांचा हा मिश्किल स्वभाव त्यांच्या टिप्पणींमधून समोर येत असतो. पुण्यात आज त्यांनी काही पदाधिकारी, गणेश मंडळांच्या घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी अशीच एक टिप्पणी केली. मात्र, ही टिप्पणी म्हणजे चंद्रकांत पाटलांचं कौतुक होतं की टोला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.