मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडणार आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडीकडून बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या बैठकीआधी महाविकास आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार गटासंदर्भातील शरद पवार यांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला आहे.