शरद पवार यांचं आता वय झालं आहे त्यांनी आता रिटायर्ड व्हावं, असा सल्ला त्यांचे मित्र सायरस पूनावाला यांनी त्यांना दिला आहे. इतकंच नव्हे तर शरद पवारांनी दोनदा पंतप्रधान होण्याची संधी घालवली, असंही ते म्हणाले. पुण्यात माध्यमांशी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं आहे.