गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असल्याचं दिसत आहे. जालन्यात आधी मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन आणि त्यावर झालेला लाठीहल्ला या मुद्द्यांवरून मोठा वाद निर्माण झाला. यावर आता राज्य सरकारकडून सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात आली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो.. जाळपोळ, बंद वगैरे राज्याचंच आहे. १० कोटी रुपयांच्या एसटी बसेस जाळल्या. हे नुकसान राज्याचंच आहे. मागच्या काळात मराठा समाजानं शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केलं. पण आत्ता त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. अतिशय सकारात्मक चर्चा आत्ताच्या बैठकीत झाली.”