Devendra Fadnavis on Maratha Morcha: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असल्याचं दिसत आहे. जालन्यात आधी मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन आणि त्यावर झालेला लाठीहल्ला या मुद्द्यांवरून मोठा वाद निर्माण झाला. यावर आता राज्य सरकारकडून सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात आली. यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “यापूर्वीही पाच वर्षे मी गृहमंत्री होतो आणि जवळपास २ हजार आंदोलनं ही आरक्षणाच्या संदर्भातली झाली होती. परंतू कधीही आम्ही बळाचा उपयोग आम्ही केला नाही. आत्ताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं. सर्वात आधी ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे, जे जखमी झाले आहेत तर मी शासनाच्या वतीने क्षमा मागतो”