जालन्यातील लाठीचार्जचे आदेश मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश आम्ही दिले हे सिद्ध करुन दाखवा, राजकारण सोडू असं आव्हान दिलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत आधी पंतप्रधानांकडून तुमच्या घोटाळ्याचे पुरावे मागा, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.